केमिकलमुक्त आहार! वेळीच जागे व्हा!!

वैद्य सत्यव्रत नानल  << [email protected] >>

आजच्या काळात घराघरात फ्रिज आणि प्रत्येक फ्रिजमध्ये अनेक गोष्टी कायम भरलेल्या दिसतात. विविध मसाले, सॉसेस, केचप्स, चटण्या अशी विविध कंपन्यांची पाकिटे फ्रिजच्या दरवाजामधून डोकावून आपल्याकडे पाहत असतात. असे सर्व पदार्थ हे जास्त काळ टिकण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळी प्रिझर्व्हेटिव्हज् आणि इतर केमिकल्स घातली जातात. एकीकडे ताजे अन्न खावे असे आपण म्हणतो आणि दुसरीकडे हे सर्व पदार्थ, जे रोज बनवावे लागतात ते बनवायला वेळ नाही म्हणून बाजारातून तयार आणून नकळतपणे शिळेच वापरले जातात.

सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जरा नीट लक्ष देऊन पाहिले तर समजेल की, आपण जास्तीत जास्त बाजारात तयार होणारे आणि केमिकल असलेले पदार्थच खातो आहोत. जसे सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीबरोबर बिस्किटे, ब्रेड, टोस्ट, खारी न्याहारी, जेवण, विविध सॉसेस, केचप, चटण्या ज्या बाजारात मिळतात, जसे टोमॅटो सॉस, सोया सॉस, टोमॅटो प्युरी, मांसाहार, बिर्यानी इत्यादी बनवताना वापरली जाणारी गरम मसाल्याची तयार पाकिटे, बाजारातील तयार आले-लसूण पेस्ट वगैरे. शिवाय आजकाल मांसाहार बनवणेच लोकांनी जवळ जवळ सोडून दिले आहे.

या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रिझर्व्हेटिव्हज्, ऑसिड-पीएच बॅलन्सर, थिकनर, आर्टिफिशल कलर असे अनेक पदार्थ घातलेले असतात. आता विचार करा, रोज हे सर्व पदार्थ थोडे थोडे आपल्या पोटात पडत राहतात. महिना किंवा वर्षभरात किती प्रमाणात हे पदार्थ आपण खाल्ले आणि त्यातले किती शरीराबाहेर पडले याचे काहीही गणित आपल्याला माहीत नसते आणि आपणही करायला जात नाही.

धान्य, गूळ बाजारातून आणून वर्षभर साठवून लागेल तसे पीठ बनवून वापरण्याची आपली संस्कृती आहे. त्यामागे शास्त्राrय कारणे आहेत. नवीन धान्य आणि नवीन गूळ रोगकारक आहे. किडनी रोग आणि मधुमेहासारख्या रोगांचे उत्तम कारण आहेत.

सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसणाऱया अनेकांना मधुमेह, हृदयरोग, यकृताचे रोग, किडनीचे रोग, कॅन्सरसारखे दुर्धर रोग कसे होतात? असे प्रश्न आपल्याला कायम पडतात. त्यांची सोपी उत्तरे वर लपलेली आहेत.

निरोगी आयुष्यासाठी….

त् जे ऑरगॅनिक किंवा नैसर्गिकरीत्या बनवलेले धान्य ज्यांच्याकडून घ्याल ते ऑरगॅनिक असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे मागा. धान्य जुने करून वापरा किंवा भाजून ठेवा आणि मग वापरा. त् गूळ, साखर ज्या उसापासून बनली आहे तो ऊस नैसर्गिक पद्धतीने बनला आहे का त्याचे प्रमाणपत्र तपासा. गूळ किमान एक वर्ष जुना असेल तर उत्तम. नसेल तर दरवर्षी गूळ घेऊन स्टीलच्या डब्यात एक वर्षभर ठेवून मग वापरावा. त् पत्री साखर म्हणजे खडीसाखर वापरावी. फ्री फ्लोइंग ब्रँडेड साखरेपेक्षा ते बरे. त् मीठ जेवणात न घालता अळणी जेवा, चवीला मीठ बाजूला चिमूटभर घेऊन मधेमधे चाखा. शक्यतो सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) वापरा. त् जेवणात कमीत कमी तेल वापरा. घाणीवर स्वतः शेंगदाणे देऊन तेल काढून घ्यावे. त् आले, लसूण, मिरचीसारखे ताजे मसाले ताजेच वापरावे. शक्यतो घराच्या कुंडीत शोभेची झाडे लावण्यापेक्षा आले, लसूण, मिरची, लिंबू, कढीपत्ता लावावे. त् दालचिनी, लवंग, काळीमिरी, तमालपत्र आणि असे अनेक सुके गरम मसाले आवश्यक तेवढे महिन्याच्या महिन्याला बनवून वापरावेत. हे सर्व करायला घरातील स्त्राrला  इतरांनी मदत करावी.