क्रोम वापरणाऱ्यांची खासगी माहिती लीक, गुगलने दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगल क्रोम वापरणाऱ्यांना गुगलने डेटा लीक होत असल्याचा इशारा दिल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. गुरुवारी अनेक गुगल युजर्सना हा अलर्ट आला आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश युजर्स हिंदुस्थानी आहेत.

गुगलकडे काही युजर्सच्या तक्रारी आल्या होत्या. काही विशिष्ट बेवसाईटला भेट दिल्यानंतर त्यांचा डेटा आणि पासवर्डही लीक झाला होता. त्यामुळे गुगलकडून तमाम गुगल युजर्सना मोबाईल, लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर अलर्ट पाठवून पासवर्ड बदलण्यास सांगितलं गेलं आहे. तसे इमेल्स गुगलतर्फे पाठवण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी क्रोमच्या नवीन व्हर्जनच्या अपडेशनवेळीही गोंधळ झाला होता. नवीन अपडेट होत असताना गुगल क्रोमकडील युजर्सचा डेटा उडाला होता. त्यामुळे आपलं अपडेट थांबवण्याचा निर्णय गुगलने घेतला होता.