इंटरनेट कनेक्शन नसल्यास, गूगल ‘क्रोम ब्राउझर’वर एक छोटासा डायनासोर का दाखवला जातो?

लॅपटॉप किंवा मोबाईलवर नेट सर्फिंग करत असताना इंटरनेट कनेक्शन बंद झाल्यास गूगल क्रोम ब्राउझरवर एक छोटा डायनासोर समोर येतो. इंटरनेट बंद झाल्यावर छोटा डायनासोर कसा आणि का येतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत.

गुगलची प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केलेली असते. हा ‘टी-रेक्स’ गेम सुद्धा असाच आहे. कुठल्याही कारणामुळे इंटरनेट कनेक्शन बंद झाले तर हा डायनासोर गेम सुरु होतो. इटरनेट बंद पडल्याने तुमचे सर्वच काम ठप्प होते. अशावेळी हा डायनासोर तुम्हाला अश्मयुगाची आठवण करून देतो. त्याकाळात वायफाय किंवा इंटरनेट नव्हते. त्या काळाची आठवण करून देण्यासाठी इंटरनेट बंद झाल्यावर ब्राऊझरवर डायनासोर येतो. 2014 च्या सुमारास हा गेम गुगलच्या पेजवर अपलोड करण्यात आला होता. त्याबाबतची माहितीही मनोरंजक आहे.

  • गुगलच्या माहितीनुसार हा गेम प्रत्येक महिन्यात 270 दशलक्ष वेळा खेळला जातो.
  • गुगलला खास मागणी करून काही मोठ्या कंपन्यांनी अशी सोय मागून घेतली आहे की, इंटरनेट बंद असतांना ते हा गेम डिसेबल करू शकतील.
  • या गेमची लोकप्रियता पाहून गुगलने खास संकेतस्थळ पण दिले आहे. जेणेकरून तुमचे वायफाय किंवा इंटरनेट डाऊन नसल्यासही हा गेम तुम्ही खेळू शकता – https://elgoog.im/t-rex/

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना विनोद जंगले यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या