एआय नोकऱ्या हिरावून घेणार नाही

सध्या आयटी क्षेत्रात क्षेत्रात सर्वत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयचा वापर आहे. एआय तंत्रज्ञानामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे. लाखो लोक बेरोजगार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे एआयआय तरुणांच्या नोकऱ्या खरंच हिरावून घेईल का? असा सवाल उपस्थित होतो. अशातच गुगल क्लाऊडचे सीईओ थॉमस कुरियन यांनी एआयचा धोका नसल्याचे वक्तव्य केलंय. ‘एआय नोकऱ्या हिरावून घेणार नाही, तर नवीन संधी निर्माण करेल,’ असे थॉमस कुरियन यांनी म्हटले आहे. थॉमस कुरियन यांनी एआय तंत्रज्ञान नोकऱ्या नष्ट करेल ही भीती फेटाळून लावली. तसेच त्याऐवजी एआय तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा जास्त साध्य करण्यास अधिक सक्षम करेल असं मत त्यांनी मांडलं आहे.