एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची सलामी 

246

गुगलने डूडलच्या माध्यमातून एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला जुन्को ताबेई यांचा सन्मान केला आहे. आज त्यांचा 80 वा वाढदिवस आहे. गूगलने डूडलमध्ये सात पर्वतांवर उडी मारणारे अ‍ॅनिमेटेड आकृती तयार केली आहे. त्यांचा जन्म 22 सप्टेंबर 1939 रोजी झाला

16 मे 1975 रोजी ताबेई एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या जगातील पहिली महिला ठरल्या. तसेच 1991 मध्ये त्यांनी अंटार्क्टिकातील माऊंट विल्सन हे शिखर सर केले. 1992 मध्ये ‘पनाक जया’ हे शिखर सर केल्यानंतर सात शिखरे सर करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. जुन्को ताबेई एकदा म्हणाल्या होत्या की, ‘एकटे तंत्रज्ञान आणि क्षमताच तुम्हाला वरच्या स्थानावर पोहोचवू शकत नाही, इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची आहे. ही अशी शक्ती आहे जी तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही. ती तुमच्या हृदयात असली पाहिजे.’

जुन्को ताबेई यांनी जपानमधील क्यूसू विद्यापीठातून एव्हरेस्टवरील पर्यावरणाच्या हानीवर पदव्युत्तर अभ्यास केला. त्या हिमालयन अ‍ॅडव्हेन्चर ट्रस्टच्या संचालिका होत्या. ताबेई यांचे पती मसानोबू ताबेई हेही गिर्यारोहक होते. 2012 मध्ये जुन्को ताबेई यांना कर्करोगाने ग्रासले आणि याच आजारात 20 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचे निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या