
हिंदुस्थानातील हजारो गूगल सर्च वापरकर्त्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. डाउनडिटेक्टरनुसार 3,300 हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. ही सेवा खंडित होण्याची घटना एक्सकोड (Xcode) आणि रेडिटवर (Reddit) देखील चर्चेचा विषय बनली आहे, तथापि, गुगलने अद्याप या समस्येचे कारण मात्र उघड केलेले नाही.
गूगलमध्ये व्यत्यय सुरू होताच, वापरकर्त्यांनी त्यांनाही तीच समस्या येत आहे का हे पाहण्यासाठी एक्स (X) आणि रेडिट (Reddit) सारख्या प्लॅटफॉर्मवर धाव घेतली, तेव्हा त्यांना आढळले की त्याच वेळी हजारो इतरांनाही तीच समस्या येत होती. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे. परंतु काही काळानंतर मात्र ही सेवा पूर्ववत झालेली आहे.
डाउनडिटेक्टरच्या (DownDetector) आकडेवारीनुसार, 57 टक्के लोकांना गूगल सर्चमध्ये समस्या आल्या. 28 टक्क्यांनी पेजेस लॉक न होण्याबद्दल तक्रार केली. 11 टक्के लोकांना वेबसाइट्समध्ये समस्या आल्या. गूगलने अद्याप व्यत्ययाचे कारण उघड केलेले नाही, परंतु तपशील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.




























































