ऑफिसमध्ये राजकारण नकोच!

ऑफिसात आल्यानंतर पॉलिटिक्स करू नये. या पॉलिटिक्सला अजिबात थारा नाही, असे सांगत गुगलने अशा 28 कर्मचाऱयांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले आहे. कामाच्या ठिकाणी काम करावे, राजकारण करू नये, हाच संदेश गुगलने दिला आहे. कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकल्यानंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱयांसाठी लिहिलेल्या पोस्टची चांगलीच चर्चा होत आहे. कर्मचाऱयांनी कार्यालयात येऊन काम करावे, राजकारणात पडू नये. ‘मिशन फर्स्ट’ शीर्षक देत पिचाई यांनी मेलमध्ये कंपनीचे धोरण आणि अपेक्षा स्पष्ट केल्या आहेत.