गुगल मॅपने शोधा हरवलेला स्मार्टफोन

स्मार्टफोन हा सर्वांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. लॉकडाऊनमध्ये स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर होत आहे. अशात मोबाईल हरवला किंवा चोरी झाला तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जर तुमचा स्मार्टफोन चोरी झालाच तर गुगल मॅपने तो शोधता येतो.

गुगल मॅपच्या मदतीने हरवलेला स्मार्टफोन शोधण्यासाठी युजरकडे फोन किंवा लॅपटॉप असावा लागेल. त्यात इंटरनेट हवे. त्याशिवाय जी-मेल अकाउंट आयडी आणि पासवर्ड असावा.

सर्वात आधी गुगलवर जाऊन गुगल मॅप ओपन करा. तिथे गुगल आयडी टाकावा लागेल, जो तुमच्या हरवलेल्या स्मार्टफोनशी लिंक्ड असेल. आयडी साईन-इन  झाल्यानंतर, वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘युवर टाईमलाईन’ हा पर्याय दिसेल. त्यात युजरची लोकेशन हिस्ट्री शोधण्यासाठी वर्ष, महिना, दिवस टाकावा लागेल.

हे फीचर कोणत्याही अँड्रॉईड फोनमध्ये असलेल्या गुगल मॅप्समध्ये वापरता येतं. युजरचा मोबाईल आणि त्यात असलेले लोकेशन सर्व्हिस फीचर ऑन असल्यास हे फीचर काम करेल.

आपली प्रतिक्रिया द्या