‘गुगल’ तुमचा रात्रंदिन पिच्छा करतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, सॅनफ्रान्सिको

‘सावध व्हा, तुम्ही कोठे जात आहात यावर गुगल सदैव लक्ष ठेवून आहे. तुमची इच्छा असो वा नसो, ऍण्ड्रॉईड मोबाईलमध्ये कितीही प्रायव्हसी सेटिंग केली तरीही तुमचे लोकेशन गुगल रेकॉर्ड करतेच. ‘असोसिएटेड प्रेस’च्या तपासणीत गुगल आपला रात्रंदिन पिच्छा करते ही बाब एका संशोधनात समोर आली आहे.

प्रिन्सेटन येथील संगणक शास्त्र्ाातील संशोधकांनी असोसिएटेड प्रेस संस्थेच्या वतीने केलेल्या संशोधनात गुगल आपले लोकेशन रेकॉर्ड करते याला दुजोरा मिळाला आहे.

बहुतांश वेळेला गुगल तुम्हाला लोकेशन माहितीसाठी परवानगी विचारते. विशेषतŠ ‘गुगल मॅप्स’ हे ऍप ‘नेव्हिगेटिंग’साठी तुमच्या लोकेशन ऍक्सेसची परवानगी मागते. जर तुन्ही सहमती दिली तर गुगल तुमच्या लोकेशनचे रेकॉर्ड ठेवते. सदर ऍपच्या टाइमलाइनमध्ये तुमच्या दैनंदिन हालचालींची माहिती नोंदली जाते.

प्रत्येक मिनिटामिनिटाची तुमच्या प्रवासाची नोंद तुमच्या खासगी जीवनावर बाधा आणू शकते. ही नोंद वापरून पोलीस संशयितांना वॉरंट धाडू शकतात.

मोबाईलधारकांच्या प्रायव्हसीचा इस्कोट

गुगलची ऍण्ड्रॉईड ऑपरेटिंग सॉफ्टवेअर वापरणाऱया दोन अब्ज मोबाईलधारकांच्या प्रायव्हसी सेटिंगला यामुळे बाधा पोहचली आहे. जगभरातील लक्षावधी आयफोन युजर्स गुगल मॅप्सवर अवलंबून असतात त्यांचेही लोकेशन नोंदले जाते. n चॉकोलेट चिप कुकीज, किडस् सायन्स किटस् ही ऍप्स तुम्ही किती अंशांवर व रेखांशावर आहात याची एका चौरस फुटापर्यंत अचूक नोंद ठेवतात.

ही तर कंपनीची थापच

तुमच्या लोकेशनचे रेकॉर्ड तुम्हाला नको असेल तर मोबाईल व आयफोनवरील लोकेशन हिस्टरीचे बटण ऑफ करा. त्या जागा अथवा ठिकाणे मग नोंदविली जाणार नाहीत असे गुगल कंपनीचे म्हणणे आहे. मात्र गुगल कंपनीचे हे म्हणणे खरे नाही. जरी तुम्ही लोकेशन हिस्टरी ऑफ केली तरीही काही गुगल ऍप्स ऍटोमॅटिकली तुमचा वेळोवेळचा लोकेशन डाटा स्टोअर करीत असतात. उदाहरणार्थ जेव्हा जेव्हा तुम्ही मॅप्स ऍप चालू करता तेव्हा गुगल तुमचा स्नॅपशॉट स्टोअर करते. मोबाईलवर दररोजचे हवामान तुम्ही कोठे आहात हे निश्चित सांगत असते.