2020 या वर्षात गूगलवर सर्वाधिक काय सर्च करण्यात आले…वाचा सविस्तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरातील लोकप्रिय सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने या वर्षात सर्वाधिक काय सर्च करण्यात आले याबाबतची यादी जाहीर केली आहे. गूगलने ‘ईयर इन सर्च 2020’ जाहीर केले असून जगभरात आणि हिंदुस्थानात सर्वाधिक कशाबाबत माहिती विचारण्यात आली. वर्षभरात टेंड्रिंग असलेले सर्च याबाबतची माहिती दिली आहे. तसेच गूगलने 2020 यावर्षाचा एक रिकॅप व्हिडीओही बनवला आहे.

जगभरात या वर्षात कोरोना महामारीचे संकट आले. त्यामुळे साहजिकच सर्चमध्ये कोरोनाव्हायरस हा सर्च आघाडीवर राहिला आहे. कोरोना व्हायरस हा या वर्षातील सर्वाधिक सर्चचा विषय ठरला आहे. जगभरातील अनेकांना कोरोना व्हायरस म्हणजे काय, तो कसा होतो, त्यापासून बचाव कसा करावा, कोरोना लस कधी येणार, कोरोनाबाबतचे निर्देश याबाबतच्या माहितीची मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात आल्याने कोरोनाव्हायरस हा सर्च अव्वल ठरला आहे.

कोरोना व्हायरसखालोखाल इलेक्शन रिझल्ट, Kobe Bryant, झूम आणि आयपीएल हे सर्च आहेत. कोरोनानंतर इलेक्शन, झूम आणि आयपीएलबाबतची माहिती मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली आहे. तसेच या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या बातम्यांमध्येही कोरोनाव्हायरसबाबतच्या बातम्या आघाडीवर आहेत. त्यानंतर इलेक्शन रिझल्ट, ईराण, बैरूत आणि हंटाव्हायरस याबाबतच्या बातम्या सर्च झाल्या आहेत. या वर्षात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्याने इलेक्शन रिझल्ट या वर्षात कोरोना व्हायरसनंतर सर्वाधिक सर्च झाला आहे.

हॉलीवूड आणि बॉलीवूडच्या सर्चमध्ये गूगलच्या सर्वाधिक ट्रेंडिंगच्या यादीत टॉम हॅन्क्स, जोक्विन फिनिक्स, अमिताभ बच्चन, रिकी गर्व्हइस आणि जडा पिन्केट स्मिथ आघाडीवर आहेत. तर सर्वाधिक सर्च झालेल्या गेममध्ये अमंग अस, फॉल गाइज -अल्टीमेट नॉकआऊट, वोलारन्ट, द लास्ट आणि यूएस 2 हे आघाडीवर आहेत.