
व्हॉट्सअॅप हे मेसेंजिंग अॅप जगभरात सर्वात जास्त वापरले जाते. सध्या नव्या पॉलिसीमुळे युजर व्हॉट्सअॅपवर नाराज आहेत. सध्यातरी कोणत्याही युजरचे व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद झालेले नसले तरी टांगती तलवार कायम आहे. व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलिग्राम अॅप आलेले आहे. मात्र टेलिग्रामला तितकासा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अशातच व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या दोघांनाही टक्कर देण्यासाठी गुगल पुढे सरसावले आहे. गुगलने जी-मेल अॅपवर एक खास चॅटिंग फीचर आणले आहे. गुगल युजर आता अँड्रॉईड आणि आयओएस डिव्हाईसमध्ये गुगल चॅट अॅप डाऊनलोड करू शकतात. अँड्रॉईड युजर गुगल प्ले स्टोअरवरून तर आयओएस युजर त्यांच्या अॅपल अॅप स्टोअरवरून जी-मेल अॅप डाऊनलोड करू शकतील. जी-मेल वापरणाऱया युजरला मेलसोबत व्हिडियो कॉन्फरन्सिंगसाठी ‘मीट’ आणि ‘रूम’चा सपोर्ट दिला जाईल. त्यानंतर जी-मेल ओपन करावे लागेल. मग काही सेटिंग करावे लागेल. सध्या ‘हँगआऊट’च्या माध्यमातून चॅटिंग करता येते. मात्र नवीन चॅटिंग फीचर सुरू झाले की गुगलचे हँगआऊट अॅप बंद होऊ शकते.





























































