
इंटरनेटच्या जमान्यात कधी कुणी चमकेल सांगता येत नाही. असेच भाग्य एका बदकाला मिळाले आहे. हे बदक कोणत्याही सेलिब्रेटीपेक्षा कमी नाही. यूटय़ूबवर त्याचे अकाऊंट असून लाखो चाहते आहेत. वर्षाला ते 37 लाखांहून अधिक कमाई करतं.
‘मंचकीन’ असं या खास बदकाचे नाव आहे. ‘डंकिन डक’ या नावाने त्याचे इन्स्टाग्राम, यूटय़ूब आणि टिकटॉकवर अकाऊंट आहे. त्यातून मंचकीण घसघशीत कमावतो. त्या पैशांतूनच तो ऐश करतो. मंचकीनची मालकीण क्रिसी एलिस आहे. ती मंचकीनचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मंचकीनचे फॅन फॉलोअर्स एवढे वाढलेत की, त्याची मालकीण आता पूर्ण वेळ त्याचे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळते. नोकरी करून किंवा व्यवसाय करून पैसे मिळणार नाहीत, तेवढे पैसे ती सध्या मंचकीनच्या माध्यमातून कमावतेय.























































