
आळंदी येथील पायी वारीचे पालखी सोहळ्यातील परंपरांचे पालन करीत श्रीगुरू पौर्णिमेनिमित्त माऊलीचे पादुका दिंडीची मंदिर व नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. पंढरपूर येथील गोपालकाला यावर्षी आळंदीत गोपाळपूर येथील मंदिरात नामगजरात करण्यात आला.
आळंदी मंदिरातील परंपरांचे पालन करीत श्रींची पहाटपूजा ,अभिषेख प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांचे हस्ते झाली. त्यानंतर माऊलींच्या पादुका दिंडीने गोपाळपूर येथील मंदिरात हरिनाम गजरात आणण्यात आल्या. येथे पूजा, गोपालकाला झाल्यानंतर प्रदक्षिणा झाली. यावेळी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील,विश्वस्त अभय टिळक,मौलींचे मानकरी योगिराज कु-हाडे,योगेश आरू, ज्ञानेश्वर गुळूंजकर, ज्ञानेश्वर दिघे,व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,सेवक चोपदर अवधूत रनदिवे,बल्लाळेश्वर वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते. आळंदी मंदिरात श्रीगुरू पौर्णिमेनिमित्त व्यास पूजा प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील यांचे हस्ते झाली. मानकरी,सेवक यांना नारळ प्रसाद वाटप झाले.
































































