कर्मचाऱयांवरील हल्ले रोखण्यासाठी केलेला कायदा स्वत:च कसा बदलता? शासकीय कर्मचाऱयांचा फडणवीसांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारी कर्मचाऱयांवरील अधिकारी-कर्मचाऱयांना होणारी मारहाण रोखण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलम 353मध्ये सुधारणा केली. पण आता देवेंद्र फडणवीसच स्वतःच केलेल्या कायदेशीर तरतुदीमध्ये बदल करीत असल्याची भावना शासकीय कर्मचाऱयांमध्ये निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या दबावावरून या कायदेशीर तरतुदीमध्ये बदल केल्यास राज्य प्रशासनात प्रक्षोभ अटळ असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने देण्यात आला.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी सहा वर्षांपूर्वी भादंवि कलम 353 व क कलम 332मध्ये सुधारणा करण्यात आली. त्याअन्वये हा गुन्हा अजामीनपात्र करून दोन ऐवजी पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. या सुधारणेमुळे शासकीय कर्मचाऱयांवरील हल्ल्यांमध्ये कमालीची घट झाली. पण या कलमाच्या संदर्भात मागील आठवडय़ात विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांनी आवाज उठवला. या कलमाअंतर्गत होणाऱया कारवाईच्या विरोधात आमदारांच्या असंतोषाचा विस्पह्ट झाला. त्यावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कलमात सुधारणा केली जाईल. त्या संदर्भातील विधेयक तीन महिन्यांत आणले जाईल असे आश्वासन आमदारांना दिले. पण राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने या कलमात सुधारणा करण्यास कडाडून विरोध केला आहे. महासंघाने या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या कलमात सुधारणा केल्यास सरकार व अधिकाऱयांमध्ये संघर्ष अटळ असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

शासकीय कर्मचाऱयांवरील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी कायदा करावा म्हणून महासंघाने वर्षानुवर्षे पाठपुरावा केला. त्यानंतर 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागतार्ह सुधारणा केली. या सुधारणेमुळे शासकीय कर्मचाऱयांवरील कमालीची घट झाली, पण आता या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा झाल्यामुळे राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱयांना संरक्षण देणाऱया कायदेशीर तरतुदीत कोणताही बदल करून नये. या संदर्भात एकतर्फी निर्णय घेतल्यास राज्यातील अधिकाऱयांकडून प्रखर विरोध होईल, असा इशारा महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई व सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिला.

अधिकाऱयांवरील हल्ल्यांचा इतिहास

मालेगावचे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना समाजपंटकाने वर्ष 2011 च्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिवंत जाळले, हे हृदयद्रावक उदाहरण अत्यंत बोलके आहे. कायदा व सुव्यवस्थेची महत्त्वपूर्ण जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा पोलीस कर्मचाऱयांना समाजपंटक आणि गुन्हेगारांकडून सार्वजनिकरीत्या होत असलेली मारहाण, शिवीगाळीच्या घटनांनी त्यांचे मनोधैर्य खच्ची होते. कारण यापूर्वीच्या काही वर्षांमध्ये अडीचशेहून अधिक सरकारी अधिकाऱयांना मारहाण झाली आहे, अशी आठवण महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी सांगितली.