
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानमधील वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे रेपिस्तान म्हणत ट्विट करणाऱ्या एका आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. शाह फैसल असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्याच्या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून टीका सुरू होती.
फैसलने २०१०मधील बॅचचा आयएएस अधिकारी आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये ‘पितृसत्ता+जनसंख्या+निरक्षरता+शराब+पॉर्न+तकनीक+अराजकता=रेपिस्तान’ असे शब्द वापरले होते. देशाबद्दल अशी वापरणं हे चुकीचं असल्यानं सर्वच स्तरातून त्याविरोधात प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यानंतर आता जम्म-कश्मीरच्या सामान्य प्रशासन विभागानं त्याला एक नोटीस धाडली आहे. ज्या म्हणण्यात आलं आहे की, आपण कथित रुपाने अधिकारिक कर्तव्य निभावण्यात प्रामाणिकता आणि सत्यनिष्ठेचं पालन करण्यात असफल राहिला आहात. लोक सेवकासाठी हे योग्य नाही.
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशांनंतर फैसल विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, त्याने या कारवाईची खिल्ली उडवत नवे ट्विट केलं आहे. दक्षिण आशियात बलात्काराविरोधातील व्यंगात्मक ट्विटसाठी माझ्या बॉसने मला प्रेमपत्र धाडलं आहे.

























































