
सामना ऑनलाईन । मुंबई
डान्सबार बंदी विषयी राज्य सरकार पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यास कमी पडले आहे. हे सरकारचे अपयश असल्याचा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. या निर्णयामुळे भविष्यात होणाऱ्या परिणामांची चिंता वाटते. त्यामुळे सरकारने डान्सबार पुन्हा सुरू होणार नाहीत यासाठी तातडीने कायदेशीर प्रक्रिया सुरू केली पाहिजे. येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात नव्याने सक्षम कायदा करावा असे मत धनंजय मुंडे यानी व्यक्त केले आहे.

























































