
राज्यातील वाढती बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचेच एक भाग म्हणून सरकारी कार्यालये तसेच 25 पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱया खासगी कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती एम्प्लॉयमेंट ऑफिसला कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांकडून रिक्त पदांची माहिती दिली जाणार नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल, असा इशारा राज्याच्या कौशल्य विकास विभागाने दिला आहे.
सरकारी कार्यालये तसेच खासगी कंपन्यांत रिक्त असणाऱया पदांची माहिती सेवायोजना कार्यालय (एम्प्लॉयमेंट ऑफिसला) कळविणे नियमानुसार बंधनकारक आहे, मात्र सरकारी तसेच खासगी आस्थापनांकडून याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. कौशल्य विकास विभागाने सर्व आस्थापनांनी रिक्त पदांची माहिती द्यावी, अन्यथा त्यांच्याकर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना सर्व आस्थापनांना दिल्या आहेत.
सेकायोजन कार्यालयाचे आता ‘जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र’ असे नामकरण करण्यात आले आहे. राज्यातील बेरोजगार युवक या कार्यालयाकडे आपल्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहितीसह नोंदणी करतात. अशा नोंदणीकृत बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे सेवायोजन कार्यालयामार्फत रिक्त जागी शिफारस केली जाते. पण अनेक शासकीय-निमशासकीय व खासगी आस्थापना या नियमाची अंमलबजाकणी न करता वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून थेट नियुक्तीद्वारे जागा भरतात असे निदर्शनास आले आहे. यामुळे सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगार तरुणांना रिक्त जागांवर शिफारस करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याची गंभीर दखल कौशल्य विभागाने घेतली आहे.
महास्वयं पोर्टलवर माहिती द्या
शासकीय-निमशासकीय कार्यालये आणि 25 पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱया खासगी आस्थापनांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती सेवायोजन कार्यालयास कळविणे नियमानुसार आवश्यक आहे. सर्व आस्थापनानी ‘महास्वयं’ या पोर्टलवर ही माहिती द्यावी. यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना त्याची माहिती मिळणे सुलभ होईल, अशा सूचना कौशल्य विकास विभागाने दिल्या आहेत.
























































