डेबिट कार्ड वापरण्यासाठी सरकारने प्रोत्साहन द्यावे, तज्ञांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकराने सामान्य नागरिकांना डेबीट कार्ड वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, डेबीट कार्डमुळेच डिजिटल पेमेंटचे मार्ग उघडतात असे मत सर्वत्र टेक्नोलॉजी कंपनीचे संस्थापक मंदार आगाशे यांनी व्यक्त केले आहे.

आगाशे म्हणाले की, डेबीट कार्डमुळेच डिजिटल पेमेंट आणि युपीआय सारखे ऑनलाईन व्यवहार करू शकतात. त्यासाठी नागरिकांना डेबीट कार्ड वापरण्यासाठी काही नवी योजना सरकारने आखल्या पाहिजे. सुरूवातीला एखादा व्यक्ती आपल्या भागात डेबीट कार्ड वापरतो. त्यामुळेत त्यांचा आत्मविश्वास वाढतो. नंतर तो युपीआय सारख्या तंत्रज्ञानाकडे वळतो. ज्या ठिकाणी एटी एम मशीन्स नाही तिथे मायक्रो एटीएएम मशीन्सशी सोय उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.