ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची शिंदे गटाला धोबीपछाड; मराठवाडा, जळगाव, सोलापूरमध्ये भगवा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील विविध 15 जिल्ह्यांतील 62 तालुक्यांतील 238 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मराठवाडा, जळगाव, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार मुसंडी मारत शिवसेनेने शिंदे गटाला धोबीपछाड दिली. मराठवाडय़ातील धाराशीव जिल्हय़ातील उमरगा तालुक्यात मतदारांनी गद्दाराच्या छाताडावर भगवा फडकवला. येथे पाचपैकी चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद यश मिळवले आहे.

जालना जिल्हय़ातील बदनापुरात भगव्याचा झंझावात पहायला मिळाला. येथील 19 पैकी 11 ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत. बीड जिल्हय़ात 3 तर लातूर जिल्हय़ात एका ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला. कसगी ग्रामपंचायतीत दोन जागा पूर्वीच बिनविरोध निघाल्या होत्या. यात शिवसेनेने 13 पैकी 12 जागांवर वर्चस्व मिळविले. तुगाव ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठीच्या निवडणुकीत 11 जागा शिवसेनेला तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या. कोरेगाववाडीच्या 9 जागांसाठीच्या निवडणुकीत शिवसेनेचे व्यंकट माने यांच्या पॅनेलने पाच जागा मिळवून ग्रामपंचातीवर वर्चस्व मिळविले.

बीड जिल्हय़ात तीन ग्रा.पं.वर भगवा

बीड जिल्हय़ात तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. गवळवाडी ग्रामपंचायतीवर जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी एकहाती सत्ता मिळवली. अंथरवण पिंप्री गणपूर आणि अंथरवण पिंप्री तांडा या दोन्ही ग्रामपंचायती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ताब्यात आल्या.

आनंदवाडी शिवसेनेच्या ताब्यात

लातूर जिल्हय़ात आनंदवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. येथे शिवसेनेचे सातही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला.

जळगावात शिंदे गटाला दे धक्का

जळगाक जिह्यातील चाळीसगाक, एरंडोल, राकेर, अमळनेर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींवर भगवा फडकवत शिवसेनेने शिंदे गटाला धक्का दिला.

सोलापूरच्या चिंचूर ग्रामपंचायतीत भगवा

दक्षिण सोलापूर तालुका हा शिकसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निकडणुकीत पुन्हा एकदा दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिकसेनेचे सातही सदस्य निकडून आले आहेत.