
ब्राह्मणवाडा, थडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठय़ा दिमाखात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजक कमांडर धीरजराजे सातपुते, प्रमुख वक्त्या साक्षी भेले, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर वासनकर, प्रमुख पाहुणे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पराग गुडदे, नरेंद्र पडोळे, जिल्हाप्रमुख अविनाश गायकवाड, सैनिक फेडरेशनचे हरिहर भातपुले, शाखाप्रमुख परतवाडा यांच्यासह सत्कारमूर्ती ज्येष्ठ समाजसेवक चंद्रशेखर भेले, नागनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक जयदीप देशमुख यांच्यासह सर्व क्षेत्रांतील मान्यवर आणि रहिवासी उपस्थित होते. यावेळी दहावी व बारावीमधील यशवंत विद्यार्थ्यांचा, उत्पृष्ट कामगिरी करणाऱया नागरिकांचा, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही सत्कार करण्यात आला.