
ग्रँट रोड परिसरातील पार्वती मॅन्शन इमारतीत एका 53 वर्षीय व्यक्तीने धारदार सुऱ्याने पाच शेजाऱ्यांना भोसकले. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समजते. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चेतन गाला नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. डि बीमार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.