कोपरगाव चिंता वाढली, आवागमन करणाऱ्या प्रवाशांना रोखण्याची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

ग्रीन झोनमध्ये असलेल्या कोपरगाव तालुक्यातील  नागरिकांना सध्या कोरोनाच्या फैलावाची भीती सतावत आहे. राज्यासह लगतच्या तालुक्यातुन हॉटस्पॉट आणि कंटेन्मेट झोनमधून  नागरिक  दाखल होत आहेत. शहरासह तालुक्यातील गावागावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तालुक्यात येण्याची परवानगी मिळालेले पासद्वारे शहरात येत आहेत. तर पास नसतानाही अनेकजण तपासणी नाके चुकवून शहरात प्रवेश करत असल्याने धोका वाढला आहे.

कोपरगाव तालुक्यात ६० ते ७० लॉकडाऊनसह इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन यांनी कोरोना रोखण्यासाठी मेहनत घेतली. त्यामुळे शहरासह तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता आणि तालुका ग्रीन झोनमध्ये आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या कोपरगाव तालुक्यात बाहेरच्या जिल्हा व तालुकातून येणाऱ्यांचा ओघ वाढतच आहे. वैध आणि अवैध मार्गाने अनेकजण शहर व परिसरात येत आहेत. हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोनमधूनही अनेक कुटूंब परतत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.मागच्या आठवड्यात दुःखद प्रसंग यात महिला डॉक्टर पॉझिटिव्ह मिळाली पाच दिवसांपूर्वी ठाण्याच्या  हॉटस्पॉटमधून दोन बहिणींना धोत्रे येथे  आजोबांनी आणले विशेष म्हणजे या मुलींचे वडील पॉझिटिव्ह असतानाही ते गावात दाखल झाले, तेव्हा गावातही खळबळ उडाली. आरोग्य प्रशासनाने त्यांची तपासणी केली आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले. एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला  महिला डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने त्या परिसरात तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे या भागात बालरोग तज्ञ डॉ.अजय  गर्जे  तसेच स्त्रीरोग तज्ञ  डॉ.  अजमेरे यांचे दवाखाने आहेत  अनेक गरोदर महिलांना डॉक्टर अजमेरे यांचे   उपचार सुरू आहेत तीच परिस्थिती डॉक्टर गर्जे यांच्या लहान मुलांच्या उपचाराच्या बाबतीत घडत आहे. कंटेन्मेंट झोन असल्यामुळे या भागात कोणालाही प्रवेश नाही.  काही गरोदर महिला असल्याने त्यांची कधीही प्रसृती होऊ शकते   परंतु त्यांना आता दुसऱ्या ठिकाणी प्रसृतीसाठी जावे लागणार असल्यामुळे  त्यांची चिंता वाढली आहे  त्यामुळे तालुक्याची  धाकधूक वाढली आहे. परवानगीशिवाय येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याची गरज व्यक्त होत आहे.