प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, प्रभावी वक्ते, झुंजार पत्रकार प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त बुधवारी दादर येथील प्रबोधनकार ठाकरे चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य, उपनेत्या विशाखा राऊत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.