मार्च महिन्यात जीएसटीचा विक्रम, एक लाख कोटीपेक्षा जास्त वसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मार्च महिन्यात जीएसटीची वसुलीचा विक्रम झाला असून तब्बल एक लाख सहा हजार 577 रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एप्रिल 2018 मध्ये जीएसटीद्वारे एक लाख तीन हजार 458 रुपयांची वसुली झाली होती. यावर्षी जानेवारीतही हा आकडा एक लाख कोटींपर्यंत पोचला होता. जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंत चार वेळा वसुली एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात मासिक सरासरी वसुली 98114 कोटी रुपये होते.
एका वर्षात जीएसटी महसुलात 15.6 टक्के वृद्धीची नोंद झाली आहे.
मार्च 2018 मध्ये जीएसटीमधून सरकारला 92,167 कोटी रुपये मिळाले होते. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये महिन्याला सरासरी जीएसटी वसुली 98,114 कोटी रुपये झाली आहे.

मार्चमध्ये जीएसटी वसुली
कर वसुली     (कोटी)
सीजीएसटी    20,353
एसजीएसटी   27,520
आयजीएसटी  50,418
अधिभार         8286