
कर्नाटकच्या हावेरी जिह्यात एका भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाख रुपयांची जीएसटी नोटीस मिळाल्याने एकच खळबळ उडाली. भाजीविक्रेत्याची तर झोपच उडाली आहे. या प्रकारानंतर मोठय़ा संख्येने दुकानदारांनी यूपीआय क्यूआर कोड काढून टाकले आहेत. अनेकांनी जीएसटीचा प्रचंड धसका घेतला आहे. संपूर्ण शहरात दुकानदारांनी ‘नो यूपीआय, ओन्ली पॅश’ असे पोस्टर्सही लावले आहेत.