गुढीपाडवा भव्यतम सोडतीतील लॉटरीच्या किमतीत वाढ, तिकिटाचा दर 100 वरून 200 रुपयांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाच्या गुढीपाडवा भव्यतम लॉटरी सोडतीतील तिकिटाच्या दरात अचानक वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 100 रुपयांना मिळणाऱया लॉटरीच्या तिकिटाची किंमत यंदा 200 रुपये करण्यात आली आहे. लॉटरी आयुक्तांनी तिकिटाचे दर वाढवल्याने याचा परिणाम थेट विक्रीवर होण्याची भीती लॉटरी विव्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

मागच्या वर्षी या भव्यतम लॉटरी तिकिटातून 45 ते 50 टक्के रक्कम ही बक्षिसांच्या रूपात ग्राहकांना दिली गेली होती. यंदाच्या गुढीपाडवा भव्यतम तिकिटातून फक्त 33 टक्केच रक्कम बक्षीस रूपात ग्राहकांना दिली जाणार आहे. हा ग्राहकांवर सरळ अन्याय असल्याचे शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी सांगितले. ग्राहकांनी 200 रुपये द्यायचे आणि त्यांना बक्षीस देताना टक्केवारी कमी करायची, हात आखडता घ्यायचा हा कुठला न्याय, असा सवालही वारंग यांनी केला आहे. वरवर पाहता लॉटरी जिंकणाऱया ग्राहकांना खूप आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत असे वाटते, पण प्रत्यक्षात मात्र बक्षिसांची रक्कम फक्त 33 टक्केच करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्य लॉटरीस खड्डय़ात घालणारा असून बक्षिसाची रक्कम मागच्या वर्षीप्रमाणेच 45 ते 50 टक्केच ठेवावी अशी मागणीही लॉटरी विव्रेता सेनेने केली आहे. तसेच या वर्षी 12 एप्रिल रोजी 53 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सोडत काढण्याची मागणीही करण्यात आली आहे.

लॉटरी एजंटचे बक्षीसही बंद

कोणा एका ग्राहकाला लॉटरी तिकीट लागले तर मोठय़ा बक्षिसाच्या रकमेतून लॉटरी एजंटला 51 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळत होते. मात्र या भव्यतम लॉटरीत एजंटला मिळणारे 51 हजार रुपयांचे बक्षीसही बंद करण्यात आले आहे. हे बक्षीस पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही लॉटरी विव्रेता सेनेने केली आहे.

दर पूर्वीप्रमाणे ठेवण्याची लॉटरी विव्रेता सेनेची मागणी

एका लॉटरी तिकिटाचा दर तब्बल 200 रुपये करण्यात आलेला आहे. हा दर त्वरित गेल्या वर्षीप्रमाणे 100 रुपये करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेने राज्याच्या लॉटरी आयुक्तांकडे केली आहे. 200 रुपयांचे लॉटरीचे तिकीट घेणे ग्राहकांच्या खिशाला परवडेल का, असा सवाल शिवसेना लॉटरी विव्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी केला. तिकिटाचा दर 200 रुपये केल्याने विक्रीवरही परिणाम होईल. याचा लाभ आपल्या राज्यात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या परराज्यातील लॉटऱयांना होईल, याकडेही मनोज वारंग यांनी राज्य लॉटरी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.