लग्नाच्या तासाभराआधी नवऱ्याची सटकली, साडीवरून झालेल्या भांडणातून होणाऱ्या पत्नीची केली हत्या

गुजरातमध्ये एका तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोची लग्नाच्या तासाभराआधी हत्या केली. साजन बारैया असे त्या तरुणाचे नाव असून त्याने सोनी हिम्मत राठोड हिची हत्या केली आहे.

साजन आणि सोनी हे गेल्या काही वर्षांपासून टेकरी चौक येथे एकत्र राहत होते. त्यांचे 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या मुहुर्तावर लग्न होणार होते. मात्र त्याच दिवशी साजन आणि सोनी हिचे एका साडीच्या मुद्द्यावरून वाद झाले. त्यानंतर साजनने घरातील एक लोखंड़ी रॉड सोनीच्या डोक्यात घातला. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने तिचे डोके भिंतीवर आपटून तिची हत्या केली. त्यानंतर तो तिथून पळून गेला.

साजन हा गरम डोक्याचा व्यक्ती असून शुक्रवार त्याचे त्याच्या शेजारच्यांसोबतही भांडण झाले होते. हे भांडण एवढे वाढले की शेजारच्यांनी साजर विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.