
गुजरातच्या सुरतमधील तापी नदीवर बांधण्यात आलेल्या वेद वारिव पुलाचा रस्ता चक्क मधोमध खचला गेला आहे. धक्कादायक बाब अशी की तब्बल 118 कोटी रुपये खर्च करून पुलाचे 40 दिवसांपूर्वीच गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. त्यामुळे आता ‘हेच का यांचे गुजरात मॉडेल’ असा सवाल केला जात आहे.
तब्बल 118 कोटी रुपये खर्च करून वापी नदीवर बांधण्यात आलेल्या या पुलाचे 17 मे रोजी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. वारिया व वेद या दोन गावांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. दीड किलोमीटरच्या या पूलाला चार लेन आहेत.
गेल्या 24 तासापासून गुजरातमध्ये पाऊस पडत आहे. पहिल्यांच पावसात या पुलाचा रस्ता मधोमध खचल्याने त्याच्या कामावर प्रश्न उभे केले जात आहेत. तसेच राज्य सरकारवर टीकाही होत आहे.
























































