हार्दिक गुजरात टायटन्सचाच, इंग्लिश खेळाडू आयपीएलबाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्दिकचे पुनरागमनासाठी अभिनंदन करण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज असल्याची हवा पसरली होती, पण प्रत्यक्षात ती अफवाच ठरली. हार्दिक पंडय़ा हा गुजरात टायटन्सचाच आहे आणि कर्णधारही आहे. येत्या 9 डिसेंबरला दुबईत आयपीएलचा लिलाव सोहळा रंगणार आहे. त्याआधी प्रत्येक संघाने आपले कायम ठेवलेल्या आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत कोटय़वधींची उधळण करून संघात स्थान दिलेल्या इंग्लिश खेळाडूंना आश्चर्यकारकरित्या सर्वच संघातून मुक्त करण्यात आले आहे.

आज आयपीएल फ्रेंचायझींना आपल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची डेडलाइन होती आणि सर्वच संघांनी आपल्या भरवशाच्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आहे, तर काही महागडय़ा खेळाडूंना मुक्त करून काही नव्या खेळाडूंना संघात घेण्याची रणनीती आखली आहे.

हे खेळाडू मुक्त झाले

n मुंबई इंडियन्स ः जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, ख्रिस जॉर्डन, रिले मेरेडिथ
n रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन अॅलन, जोश हेझलवूड, मायकल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, केदार जाधव
n गुजरात टायटन्स ः ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका, शिवम मावी.
n लखनऊ सुपर जायंट्स ः जयदेव उनाडकट, डॅनियल सॅम्स, करुण नायर
n सनरायझर्स हैदराबाद ः हॅरी ब्रुक, आदिल राशीद, अकील होसेन
n कोलकाता नाइट रायडर्स ः शाकिब अल हसन, लिटन दास, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी,
n पंजाब किंग्ज ः भानुका राजपक्षे, मोहित राठी, शाहरुख खान
n राजस्थान रॉयल्स ः ज्यो रुट, अब्दुल बासित, जेसन होल्डर, कुलदीप यादव
n दिल्ली पॅपिटल्स ः रिले रिसो, रॉवमन पॉवेल, फिल सॉल्ट, मुस्तफिजूर रहमान, सरफराज खान
n चेन्नई सुपर किंग्ज ः बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, सिसांदा मगाला, कायल जेमिसन,