…तर सहकारी संस्थेचा कारभार सुरळीत चालतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gulabrao-patil-ap-baviskar

सामना प्रतिनिधी । जळगाव

बेशिस्त कारभारामुळे अनेक सहकारी संस्था यापूर्वी डबघाईला आल्या आहेत. सचोटी, प्रामाणिकपणा, शिस्त आणि योग्य नियोजन, सभासदांसोबत पारदर्शक व्यवहार असेल तर सहकारी संस्थेचा कारभार सुरळीत चालतो. विस्तार अधिकारी ए.पी. बाविस्कर हे शिस्तप्रिय असून त्यांचे शैक्षणिक व सहकारातील कार्य हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

शिक्षण विस्तार अधिकारी ए. पी. बाविस्कर यांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाला गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शिक्षण विस्तार अक्षिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ए. पी. बाविस्कर यांची ग.स. सोसायटीवर स्विकृत तज्ज्ञ संचालक म्हणून निवड झाल्याबद्यल श्रीदत्त सांस्कृतिक मंडळ व मित्रपरिवारातर्फे गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्मक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार गटाचे अध्यक्ष बी. बी. पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, शिक्षण सभापती पोपट भोळे, नगररेविका भारती सोनवणे, कैलासआप्पा सोनवणे, मयुर कापसे, सहकार गटाचे श्रेष्ठी व सोसायटीचे अध्यक्ष विलास नेरकर, उपाध्यक्ष कैलास चव्हाण आदी उपास्थित होते.

ग. स. सोसायटीच्या सभासदभिमुख कारभाराला नेहमीच सहकार्य करू असे गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिले. यावेळी सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.आबा पाटील, शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे आदी मान्यवरांनी विस्तार अधिकारी ए पी पाटील यांच्या अनुभवाचा सोसायटीला फायदा होऊन सोसायटी आणखीन नावारूपाला येईल असे सांगितले.

आदर्श व्यक्तींचा झाला सत्कार

यावेळी पी. एच. डी. मिळाल्याबद्दल विजय बागुल, हिरकणी पुरस्काराबद्दल ज्योती राणे यांचा तर आदर्श पुरस्कारा बद्दल प्रमोद पाटील व मच्छींद्र कोळी यांचाही गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रामुख्याने धरणगांव, जळगांव व एरोडल तालुक्यातील मोठ्या संख्येने सभासद व शिक्षकवृंद उपास्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोहर खोंडे यांनी तर प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीदत्त सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.