‘गुल्हर’ने कुतूहल वाढवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही आशयघन मराठी चित्रपटांनी नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या शीर्षकाने लक्ष वेधून घेतले. यापैकीच एक असलेला ‘गुल्हर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुल्हर’चे मोशन पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले.

‘गुल्हर’च्या मोशन पोस्टरमध्ये एक कोरा फळा समोर येतो, ज्यावर ‘गोष्ट एका उनाड मनाची’ ही टॅगलाइन आहे. अचानक असं काहीतरी घडते की, फळा असलेली भिंतच तुटते आणि त्यासोबत त्या फळ्यालाही तडा जातो. नेमकं काय घडतं आणि या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत कुतूहल जागवणारं असे हे मोशन पोस्टर आहे. कथानकाबाबत एका वाक्यात सांगायचं तर चालीरीतींविरोधात रणशिंग फुंकत प्राणिमात्रांवर दया करायला शिकवणारी गोष्ट ‘गुल्हर’मध्ये पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट गुल्हर नावाच्या एका 11 वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत आदी कलाकारांनी काम केलेय. दिग्दर्शन रमेश चौधरी यांचे आहे.