Video काबुल विमानतळावर गोळीबार, पाच जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काबुल विमानतळावर पलायन करण्यासाठी नागरिकांचा एकच गोंधळ निर्माण झाला आहे. विमानतळावर गोळीबार केल्याने आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानी नागरिक अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी हिंदुस्थान सरकर प्रयत्न करत आहे.

हिंदुस्थान सरकार चाबहार बंदराचा वापर करून आपल्या नागरिकांना परत मायदेशी आणू शकतात.

अफगाणिस्ताचे राष्ट्रापती अशरफ गणी यांनी पलायन केले असून ते अमेरिकेत जाऊ शकतात. गणी यांनी ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतल्याचे आधी सांगण्यात येत होते, परंतु ताजिकिस्तान हे वृत्त फेटाळले आहे.

अफगाणिस्तानमधून पलायन करण्यासाठी काबुल विमानतळावर नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. विमानतळावर गोळीबार झाला असून त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.