गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्ञानसेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २९ जुलै रोजी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत डोंबिवली पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थान येथील वरद सभागृहात पार पडणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलो आहे. जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

सामुदायिक पारायण

श्री स्वामी समर्थ सेवा परिवारतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. वसईच्या भुईगाव येथील स्वामी समर्थ मठ याठिकाणी २९ जुलै रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० ते ९ यावेळेत रुद्राभिषेक, सकाळी ९.३० ते ११.३० श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे सामुदायिक पारायण, दुपारी १२ ते २.३० महाप्रसाद (भंडारा), सायंकाळी ४ ते ६ सामुदायिक नामस्मरण असे कार्यक्रम होणार आहेत. तरी स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा परिवाराचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी केले आहे.