गंगा स्वच्छतेसाठी उपोषणाला बसलेल्या स्वामी सानंद यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाराणसी 

गंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी स्वामी ज्ञानस्वरुप सानंद गेले 111दिवस उपोषणाला बसले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले होते. दुपारी दोन वाजता त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पर्यावरणवादी प्राद. जीडी अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञानस्वरुप सानंद यानी गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आण प्रदूषण रोखण्यासाठी उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान त्यांची तब्येत ढासळत गेली. बुधवारीत स्वामींनी पाणी सुद्धा घेण्यास नकार दिला होता. मंगळवारी त्यांची तब्येत खालावल्याने एम्समध्ये दाखल केले होते. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.