ज्ञानवापी मशीद – ‘शिवलिंगा’ची कार्बन डेटिंग टेस्ट करण्यास न्यायालयाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगबाबत fिजल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या कथित शिवलिंगाची कार्बन डेटिंग होणार नाही, असा निर्णय जिल्हा न्यायालयाने दिला आहे. ए. के. विश्वेश  यांनी कार्बन डेटिंगची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाचा हा निर्णय हिंदू पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

न्यायालयाने ही मागणी फेटाळताना म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कथित शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवावी. अशा स्थितीत कार्बन डेटिंगदरम्यान शिवलिंगाचे नुकसान झाले तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन ठरेल. त्यामुळे सर्वसामान्यांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जाऊ शकतात.