पूर्ववैमन्यसातून हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

628
murder-knife

पूर्ववैमन्यसातून तिघांनी सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना हडपसरमधील भेकराईनगरमध्ये घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री घटना घडली असून, पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले आहे. शोएब माजीद शेख (वय २७) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी आणि शोएब एकाच परिसरातील आहेत. त्यांच्यात यापूर्वी वाद झाल्याने शोएबने त्याला मारहाण केली होती. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद पुन्हा सुरू झाले होते. शुक्रवारी मध्यरात्री शोएब भेकराईनगरमध्ये गेला असताना तिघांनी त्याच्यावर वार करून पसार झाले. याची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्रीत शोध मोहीम राबवत तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. शोएब सरकार राज नावाचा ग्रुप चालवत होता.

आपली प्रतिक्रिया द्या