चंद्रपुरात गारांचा पाऊस; गारांमुळे चारचाकी गाड्यांच्या काचांना नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले आहे, आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शहरातील अनेक रस्ते पूर ग्रस्त झाले, या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गारा पडल्या मुळे चारचाकी गाड्यांचे काच फुटून गाड्यांचे नुकसान झाले आहे, मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यात विचित्र वातावरण सुरू आहे. दिवसभर लाहीलाही करणारे ऊन अन संध्याकाळी पाच नंतर वादळी पाऊस जिल्ह्यात बघायला मिळत आहे. या विचित्र वातावरणाचा फटका जिल्हा वासियांना बसत आहे. वादळी पावसाने अनेक घरांची पडझड झालेली आहे. पुन्हा काही दिवस जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे जिल्हा वाशियांची धाकधूक वाढली आहे.