आश्चर्य…जीभेवर उगवले केस, शस्त्रक्रियेनंतर महिलेला बसला धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एखाद्या मोठ्या आजारातून बरे होण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टर अँण्टिबायोटिक म्हणजेच प्रतिजैविकं घेण्याचा सल्ला देतात. यामुळे रुग्णाचा जीव वाचत असला तरी त्याचे काही दुष्परिणामही शरीरावर दिसू शकतात. अशाच प्रकारची घटना अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत घडली आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर उपचार आणि सर्जरी केल्यानंतर या महिलेला एका विचित्र समस्येला तोंड द्यावे लागले, याविषयी वाचून थक्क व्हाल.

अमेरिकेत राहणाऱ्या कॅमरून (42) या महिलेला 2013 साली स्क्वैमस सेल कार्सिनोमा हा दुर्मिळ त्वचेचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. यावर तिने त्वरीत औषधोपचार घेण्यास सुरुवात केली. उपचारांवेळी डॉक्टरांना तिच्या जिभेवर खूप स्पॉट्स दिसले. त्यामुळे त्यांनी तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया करून त्या ठिकाणी मांडीची त्वचा लावली. त्यानंतर तिला अतिशय धक्कादायक अनुभव आला.

कॅमरून तिच्या या धक्कादायक अनुभवाबाबत सांगते, डॉक्टरांनी तिच्या जिभेवर आलेला स्पॉट पाहिला होता. त्यानंतर 3 वर्षांनी तिला तोंडाचा कर्करोग झाल्याचं सांगितलं. या अतिभयंकर आजाराचा सामना करायचाच असा निश्चय तिने केला. त्यानंतर कर्करोगावर उपचार करण्यासाठी तिच्या जिभेचा एक भाग कापण्यात आला. तिच्या मांडीची त्वचा जिभेच्या कापलेल्या भागावर लावण्यात आली. या उपचारादरम्यान ती कर्करोगाशी लढली असली तरीही तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागलं. शरीराच्या ज्या अवयवावर कधीही केस येत नाहीत असा अवयव म्हणजे जीभ. कैमरूनच्या जिभेवर सर्जरीनंतर केस येऊ लागले.

कॅमरून मांडीची त्वचा काढून जिभेला लावण्यात आली. या ऑपरेशनला तब्बल 9 तास लागले असून तिला जिभेच्या डाव्या बाजूच्या त्वचेला पदार्थांची चव जाणवते, तर जिभेच्या उजव्या बाजूला जिथे पायाची त्वचा आहे त्या जागी केस उगवू लागले आहेत.