मक्केच्या यात्रेसाठी जाणाऱ्या बसला अपघात, 20 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लीम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या मक्केच्या हज यात्रेसाठी अनेक मुस्लीम दरवर्षी जातात. यंदाही या यात्रेसाठी जगभरातल्या मुस्लिमांनी या यात्रेला हजेरी लावली आहे. दरम्यान, सोमवारी हज यात्रेला जाणाऱ्या एका बसला अपघात झाल्याने 20 जणांचा मृत्यू झाला असून 24हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

ही घटना सौदी अरेबियाच्या दक्षिणेला असलेल्या असीर येथे घडली आहे. या बसमध्ये हजचे यात्रेकरू होते. सध्या रमजान हा मुस्लीमांचा पवित्र महिना सुरू आहे. रमजानच्या पहिल्या आठवड्यात अनेक मुस्लीम हजला आवर्जून जातात. या यात्रेकरूंची वाहतूक करणं हे एक आव्हान असतं. मात्र, त्याच दरम्यान हा अपघात झाला आहे.

हज यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या या बसचे ब्रेक निकामी झाल्याने ती अनियंत्रित झाली आणि पुलाच्या कठड्याला आपटून पलटली. पलटल्यामुळे बसला आग लागली. या दुर्घटनेत 20 दजणांचा जागीच मृत्यू झाला तर 29 जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.