‘हॅम्लेट’ नाटक छोटय़ा पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेल्या विल्यम शेक्सपिअर लिखित ‘हॅम्लेट’ नाटक टेलिव्हिजनवर बघता येणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी ‘हॅम्लेट’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर असून झी मराठीवर दुपारी 12 आणि संध्याकाळी 7 वाजता हे नाटक बघता येईल.

हॅम्लेटची प्रमुख भूमिका सुमित राघवन यांनी साकारली आहे. याशिवाय तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले या कलाकारांनी काम केले. नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, कालातीत अशी ओळख असलेले ‘हॅम्लेट’ नाटक साकारावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. रंगमंचावरून आता हे नाटक टेलिव्हिजनच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांच्या घरी पोहोचणार आहे.

60 वर्षांपूर्वी नाना जोग, दामू केंकरे यांनी केलेल्या या नाटकाचे पुनर्लेखन प्रशांत दळवी यांनी केले आहे, तर या नाटकाला राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे.