दिव्यांगांची कोरोना योद्धय़ांना मानवंदना

कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणारे सफाई कामगार, पोलीस, डॉक्टर अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह अहोरात्र देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणारे आपले सैनिक बांधव यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्यांगांनी ओरिगामी कलाकृतीतून 18 बाय 10 फुटांचा तिरंगा साकारला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि उजागर संस्था यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सोमवारी आयोजित केला होता. घरा-घरांतून लिखित संदेश असलेल्या कागदाच्या 2021 ओरिगामी कलाकृती एकत्रित करून श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 15 दिव्यांगांनी या आकृत्यांपासून तिरंगा तयार केला आहे. आपृत्यांवर लिहिलेले संदेश सीमेवरील जवानांना पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या