हा कसला अष्टपैलू? हरभजन सिंगने केली हार्दिक पांडय़ावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

एकीकडे बेन स्टोक्स, सॅम करण व ख्रिस वोक्स ही मंडळी अष्टपैलू कामगिरी करीत इंग्लंडला संस्मरणीय विजय मिळवून देत असतानाच दुसरीकडे हार्दिक पांडय़ा मात्र न फलंदाजीत चमक दाखवतोय न गोलंदाजीत. तर मग याला अष्टपैलू का म्हणावे, असा सवाल उपस्थित केलाय ऑफस्पिनर हरभजन सिंग याने.

हार्दीक पांड्या आणि परिणितीचं चाललंय तरी काय ?

अष्टपैलू खेळाडू हा फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही महत्त्वाच्या विभागांत आपले योगदान देतो. पण हार्दिक पांडय़ाच्या बॅटमधून धावा निघत नाहीत आणि प्रतिस्पर्ध्यांचे फलंदाज बादही होत नाहीत. त्याच्या नावासमोरून अष्टपैलू टॅग काढून टाकायला हवा. कर्णधार त्याच्यावर विश्वासही ठेवताना दिसत नाही, असे परखड मत हरभजन सिंगने पुढे व्यक्त केले.

रवी शास्त्रीही झाले टार्गेट

सध्याचा हिंदुस्थानी संघ सर्वोत्तम टुअरिंग संघ आहे असा दावा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांनी इंग्लंड दौऱयाआधी केला होता. पण वन डे मालिका पराभूत झाल्यानंतर आता टीम इंडियावर कसोटी मालिकेतही पराभूत होण्याची आपत्ती कोसळतेय. प्रत्येक सामन्यामध्ये संघामध्ये बदल केल्यामुळे टीम इंडिया हरतेय, असे हरभजन सिंग यावेळी म्हणाला.

विराटने हार्दिक पांड्याबाबत केला गंमतीशीर खुलासा

लॉर्डस् येथील ओल्या खेळपट्टीवर दोन फिरकी गोलंदाजांना खेळवून संघ व्यवस्थापनाने स्वतŠच्या पायावरच हातोडा मारला. तिथे संघामध्ये वेगवान गोलंदाजांची गरज होती, असेही हरभजन सिंगने पुढे स्पष्टपणे सांगितले.

पराभवानंतर सराव नाहीच

लॉर्डस् येथे झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी अद्याप नेटमध्ये सराव केलेला नाही. हिंदुस्थानचा संघ बुधवारी नॉटिंगहॅम येथे पोहोचला असून गुरुवारी विराट कोहली ऍण्ड कंपनी सराव करील अशी शक्यता आहे.