हार्बरवर तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

गुरुवारी सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मानसरोवर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पनवेल ते सीएसएमटीही वाहतूक संपूर्णतः कोलमडली आहे.

सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांना याचा फटका बसला आहे. प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. खारघर रेल्वे स्थानकात घोषणा करुन प्रवाशांना या बिघाडाची माहिती देण्यात आली. रेल्वेकडून दुरुस्तीचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. ऐन कामाच्या वेळीच हा बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे.