
हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकात मालगाडीचं इंजिन बंद पडल्याने त्याचा फटका हार्बर रेल्वे सेवेला बसला आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
एक मालगाडी कुर्ला स्थानकात क्रॉसिंग करत मुख्य मार्गावर येत असताना त्या गाडीचं इंजिन बंद पडलं आणि त्याचा परिणाम हार्बर रेल्वे सेवेवर झाला. ट्रॅक पार करत असताना इंजिन बंद पडल्याने सीएसएमटीकडे जाणारी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.





























































