
हिंदुस्थानचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नताशासोबत विभक्त झाल्यानंतर तो दुसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. तो सध्या मॉडेल माहिका शर्मासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. त्याने नुकतेच गर्लफ्रेंड महिकासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत, नुकतेच दोघांनी कार धुताना एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये त्यांचा रोमॅण्टिक अंदाज चाहत्यांना आवडला आहे.त्यांचा हबा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हार्दिक पंड्याने आपला वाढदिवस माहिका शर्मा हिच्यासोबत मालदीवमध्ये साजरा केला. या वाढदिवसाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. हार्दिक पंड्याने शेअर केलेल्या एका व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये दोघे एकत्र मिळून गाडी धुताना दिसत आहेत. हार्दिक साबण लावून कापडाने गाडी स्वच्छ करत आहे तर महिका पाईपाने पाणी टाकतेय. यादरम्यान माहिका हार्दिकच्या गालावर प्रेमाने किस घेते. दोघेजण गाडी धुताना रोमॅंटिक होताना दिसत आहेत. अनेकांना माहिका आणि हार्दिक पंड्या यांचा व्हिडीओ आवडत आहे.
हार्दिक आणि महिकाच्या या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी कमेंट केल्या आहेत. लोकांनी या जोडीवर हार्ट इमोजी बनवून प्रेमाचा वर्षाव केला आहे. महिका शर्मा हार्दिकपेक्षा सात वर्षांनी लहान आहे. महिका एक यशस्वी मॉडेल आहे आणि तिने अनेक मोठ्या ब्रँडसोबत काम केले आहे. नताशा आणि हार्दिक विभक्त झाले आहेत. नताशा आणि हार्दिक पंंड्याला एक मुलगा असून दोघे मिळून त्याचा सांभाळ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





























































