दुखापत टीम इंडियाची ‘पाठ’ सोडेना, बुमराहनंतर पांड्या उपचारासाठी इंग्लंडला जाणार

606

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या पाठीच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्टर झाल्यामुळे त्यावरील उपचारासाठी या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. यानंतर आता टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी आली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या पाठीच्या दुखण्याने बेजार झाला असून उपचारासाठी तो इंग्लंडला रवाना होणार आहे.

बुमराह उपचारासाठी इंग्लंडला जाणार, वर्षभर संघातून बाहेर राहणार?

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये नुकत्यात झालेल्या टी-20 मालिकेदरम्यान पांड्याच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले. त्यावर उपचारासाठी तो बुधवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. गेल्या दोन वर्षात पांड्या तिसऱ्यांदा पाठीच्या उपचारासाठी विदेशात जाणार आहे. 2018 आणि 2019 मध्ये पाठीच्या दुखण्यावर इंग्लंडमध्ये ज्या तज्ज्ञाने उपचार केले होते, त्याच्याकडूनच पांड्या उपचार करून घेणार आहे.

बीसीसीयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पांड्या इंग्लंडमध्ये विशेषत्ज्ञाकडून पाठीच्या दुखण्याबाबत चर्चा करणार असून त्यावर शस्त्रक्रिया करायची अथवा नाही किंवा फक्त औषधांनी हे दुखणे बरे होईल याबाबत निर्णय घेईल, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या