हॅरी पॉटरचे वडील जेम्स पॉटरआणि लुना लव्हगुड यांच्या अफेअरची चर्चा….जाणून घ्या काय आहे प्रेमप्रकरण….

जे. के. रॉलिंगचा अत्यंत लाडका मानसपुत्र हॅरी पॉटर. साऱ्या जगातील पुस्तक विक्रीचे विक्रम हॅरी पॉटरने मोडीत काढले. बसचे तिकीट, हॉटेलमधील पेपर नॅपकीन्स.. मिळेल त्या कागदावर रॉलिंगबाईंचा मानसपुत्र अवतरत गेला आणि लहान – मोठ्यांच्या गळ्यातला ताईत झाला. हॅरी पॉटर आणि त्याचे अनोखे जादुई विश्व पुस्तकांचे जग ओलांडून चित्र- नाट्य विश्वात सहजी संचार करू लागले. यातही सगळ्या व्यक्तिरेखांनाआणि त्या साकारणाऱ्या कलाकारांना तितकेच यश मिळाले.

हॅरी पॉटरची मैत्रीण लुना लव्हगुड, हॅरीचे वडील जेम्स पॉटर याही लोकप्रिय व्यक्तिरेखा. लुना लव्हगुड साकारणारी इव्हाना लिंच आणि छोटा जेम्स पॉटर साकारणारा रॉबी जार्विस यांच्यात प्रेमबंध निर्माण होऊन ते नऊ वर्ष एकत्र होते. अर्थात हॅरी पॉटरमध्ये जार्विस फारच कमी वेळ दिसला होता कारण तो फक्त हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्समधील फ्लॅशबॅक सीनमध्ये होता .सेटवर असताना लिंच आणि जार्विस यांचे जवळचे बंध निर्माण झाले आणि 2015 पर्यंत त्यांनी गुप्तपणे डेटिंग केले. पुढे त्यांनी आपले नाते जगजाहीरही केले.

द मिररच्या वृत्तानुसार, लिंचने मे 2015 मध्ये सोशल मीडियावर जार्विसच्या फोटोला कॅप्शन दिले: “या लहान बाळाला 29 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!! सर्वात गोड मुलगा! एकत्र शो पाहण्यासाठी निघालो #happybirthdayrobbie.” न्यूझीलंडमधील हॉबिटनच्या सहलीचे फोटो देखील Instagram वर शेअर केले गेले होते. या वाढदिवशीच लिंचने जार्विसला शाकाहाराचे धडे दिले. त्याला शाकाहारी अन्न खाण्यास भाग पाडले. आणि येथूनच त्यांच्या नात्यात दुरावा येण्यास सुरुवात झाली. पुढे 2016 मध्ये ही जोडी विभक्त झाली, तरीही ते जवळचे मित्र राहिले. फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देमच्या प्रीमियरमध्ये बोलताना लिंच म्हणाली: “आम्ही दोघेही शाकाहारी आहोत, त्यामुळे आम्ही अनेक शाकाहारी कार्यक्रमांना एकत्र जातो. त्यामुळे हो, आम्ही चांगले मित्र आहोत.