
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईकर पृथ्वी शॉ यांने अतिशय खडतर परिश्रम घेत आपली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द कमी वयात घडवली आहे. तो वयाने अतिशय लहान असल्याने देशातील क्रिकेट प्रशासकांनी त्याला जपायला हवे. कारण टीम इंडियाच्या या बहुमूल्य खेळाडूची क्रिकेट कारकीर्द अकालीच अडचणीत येऊ नये यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन करणे ही आपली जबाबदारी आहे, असे आवाहन करणारे ट्विट करीत नामवंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी पृथ्वीवर ओढवलेल्या संकटाबाबत सहानुभूती दर्शवली आहे.
होय, माझी चूक झाली! बंदीच्या निर्णयानंतर पृथ्वी शॉचे भावूक ट्वीट
मुंबई आणि टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहावे लागणार आहे. पृथ्वी शॉवर बीसीसीआयने आठ महिन्यांची क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यानंतर त्याला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी एक वरील ट्विट केले आहे.
क्रिकेट माझे आयुष्य, लवकरच दमदार पुनरागमन करेन- पृथ्वी
‘प्रामाणिकपणे मी माझी चूक स्वीकारत आहे. गेल्या स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त असताना औषधे घेताना माझ्याकडून हे घडले असावे. क्रिकेट हे माझे आयुष्य असून मुंबईचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे हेच माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानास्पद आहे. लवकरात लवकर क्रिकेट मैदानात दमदार पुनरागमन साजरे करेन, असा विश्वास पृथ्वी शॉ याने ट्विट करीत व्यक्त केला आहे.




























































