अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री – हर्षवर्धन सपकाळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. कोणासोबत युती करायची, पालकमंत्री कोण याचासुद्धा निर्णय तेच घेतात. फडणवीस हे नामधारी मुख्यमंत्री आहेत, असा उपरोधिक टोला कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

महाराष्ट्राच्या इतिहासातील हे सगळय़ात लाचार सरकार आहे. राज्यात टोळीयुद्ध सुरू आहे. पुढच्या वर्षात तरी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे. पुढच्या कालावधीसाठी त्यांना शुभेच्छा देतो असे सपकाळ म्हणाले.