
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला साडीतील फोटो काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे उर्फ मामा यांनी फेसबूकवर फॉरवर्ड केला. त्याची शिक्षा म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मामा पगारे यांना साडी नेसवून शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर त्यांचा हात पकडून धक्काबुक्की करत जातिवाचक शिवीगाळही केली. यानंतर मामा पगारे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, मात्र टिळकनगर पोलिसांनी ही मागणी फेटाळली. याचा निषेध म्हणून शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याणच्या पोलीस उपायुक्त कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी मामा पगारे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेतले आणि स्टेजवर नेले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
कल्याण येथील पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांनी निष्ठावान कार्यकर्ते मामा पगारे यांना खांद्यावर घेतले आणि स्टेजवर उचलून नेले. त्यानंतर दोन्ही हात उंचावून काँग्रेस मामा पगारे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठी ठाम उभी असल्याचे सूचित केले.
‘संविधान की रक्षा करेगा कौन, हम करेंगे हम करेंगे’, ‘हर्षवर्धन सपकाळ तुम आगे पढो, हम तुम्हारे साथ है’ ‘राहुल गांधी आगे पढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राहुलजी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, मामा पगारे यांच्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.
पंतप्रधान मोदींचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला साडीतील फोटो प्रकाश पगारे उर्फ मामा यांनी फॉरवर्ड केला. त्याची शिक्षा म्हणून भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना साडी नेसवून शिवीगाळ केली होती. आता त्याच पगारे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर उचलून घेतले. pic.twitter.com/chyL4KoAzS
— Saamana Online (@SaamanaOnline) October 11, 2025